महाराष्ट्र मुंबई

साध्वी प्रज्ञा यांना आलेल्या ‘त्या’ पत्राचं पुण्याशी कनेक्शन??

मुंबई | भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील घरी पोस्टाद्वारे एक संशयास्पद पत्र पाठवण्यात आलं होतं. हे उर्दू भाषेतील पत्र पुण्यातून पाठवण्यात आल्याचं चौकशीतून समोर आलंय. 

साध्वींना आलेल्या पत्रावर एका व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर खडकीचा पत्ता दिला आहे. याबाबत अद्याप पुणे पोलिसांना कोणी संपर्क साधला नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या पत्राच्या लिफाफ्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या दोन पावडरच्या पुड्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोवर लाल रंगाने फुली मारून बंदूक रोखण्यात आली आहे. संबंधित पत्रावर स्वामी रामचंद्र अय्यर ईश्वरचंद असा पत्र पाठविणाऱ्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या घरी धाव घेऊन पत्रासह पावडरच्या पुड्या ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांकडे कोणीही संपर्क साधला नाही.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या