बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप-शिवसेनेचे नगरसेवक भिडले, सभागृहात जोरदार घोषणाबाजी अन् तू तू मै मै

मुंबई | नायर रूग्णालयात जखमींवर उपचारात दिरंगाई झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सेना-भाजपने आज मुंबई महापालिकेत जोरदार राडा घातला. त्यावेळी शिवसेना (Shivsena) आणि भाजपचे (BJP) नगरसेवक आमने सामने आल्याचं पहायला मिळालं होतं. दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांचे मुद्दे उधळून लावत जोरदार राडा घाल्याचं पहायला मिळालं आहे. (BJP-Sena corporators clashed in Mumbai Municipal Corporation hall)

दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. नायर रूग्णालयात झालेल्या घटनेवरून भाजप नगरसेवकांनी आरोग्य समितीचा राजीनामा दिला होता. त्यावरून शिवसेना नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजप नगरसेवकांना डिवचलं.

भाजपचे लोक राजीनामे देतात आम्ही शिवसेनेचे लोक मात्र लढतो, असं यशवंत जाधव यांनी म्हटलं. त्यावरून वादाला तोंड फुटलं आणि दोन्ही पक्षातील नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी सभागृहाचं वातावरण तापल्याचं पहायला मिळालं होतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला अन् यामध्ये चारजणांना भाजलं होतं. यामध्ये एका 4 महिन्याच्या बाळाचा देखील समावेश होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी त्यांना वेळीच उपचार मिळाले नसल्याने 4 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

थोडक्यात बातम्या-

‘…मग मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो का?’; अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं

Mayank Agarwal ची बॅट तळपली! शतक ठोकत उडवला किवीं गोलंदाजांचा धुव्वा

शरद पवार यांच्यासोबत क्रिकेट सामना पाहण्याची संधी, रुपाली चाकणकर म्हणतात…

एसटी कर्मचाऱ्यांवर सर्वात मोठी कारवाई होणार, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

लवकर वसतिगृहे चालू करा! स्टुडंट हेलपिंग हँड व छात्रभारतीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More