बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रेकींग! शिवसेना भवनासमोर आंदोलनात भाजप-सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई | राम मंदिराच्या जमीन खरेदीवरून घोटाळा झाल्याचा आरोप ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. मात्र यामुळे राज्यातील भाजप-शिवसेनेमध्ये खडाजंगी चालू आहे. अशातच मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर मोर्चा काढून निषेध करणार होते.

भाजपचा हा मोर्चा पोलिसांनी शिवसेना भवनाच्या अडवला आणि कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमधून नेलं. मात्र दुसरीकडे महिला भाजप कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर असलेल्या आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं पण दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. तर शिवसेनेने भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि व्हॅनमधून नेत होते. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली असा आरोप शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. हे प्रकरणावरून आणखी राजकारण तापण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हे जगाला ठाऊक पण रामकार्यात तंगड घालाल तर…”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचा शोध; तीन शिवकालिन चित्र परदेशातील संग्रहालयात

“संभाजीराजे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, तुम्ही उद्याच मुंबईला या!”

‘…त्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारलं’; हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरात कबुली

‘या’ देशात तब्बल 900 लोकांना एक्सपायर झालेल्या कोरोना लसीचे डोस

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More