Top News

‘चला हवा येऊ द्या’च्या टीमकडून शिवसेनेची फिरकी; भाजप शेअर करतंय व्हीडिओ

Loading...

मुंबई | 23 जानेवारीला शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने मंचावर शिवसेनेची फिरकी घेतली होती. यावरुन भाजपने एक व्हिडीओ शेअर करत शिवसेनेला ट्रोल केलं आहे.

भाजपने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कलाकार निलेश साबळे पालक तर श्रेया बुगडे शिक्षिकेच्या भूमिकेत आहेत. यात निलेश साबळेचा मुलगा नापास झाला असतो. तरीही साबळे पेढे वाटत असतो. यावर शिक्षिका त्याला विचारते. अहो तुमचा मुलगा नापास झाला आहे, तरी तुम्ही पेढे का वाटत आहात.

Loading...

निलेश साबळे यावर भन्नाट उत्तर देतो. अहो, वर्गातील 70 टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे माझा मुलगा बहुमताच्या बाजूने आहे. येथे लोकशाही आहे त्यामुळे तुम्ही काहीही बोलू शकत नाही, असं साबळे म्हणतो. भाजपने हा व्हिडीओ शेअर करत ‘सत्य नेहमी पाठलाग करीत राहतं!’, असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, भाजपने व्हीडिओ शेअर करत शिवसेनेला चिमटा काढला असल्याने सेना यावर काय उत्तर देते हे पाहावं लागेल.

 

Loading...

 

ट्रेंडिंग बातम्या-

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या