बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संजय राऊत आले आणि सगळं फिसकटलं’, बंडखोर आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | संजय राऊतांना(Sanajy Raut) ईडीने(ED) अटक केली, त्यावर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यात ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला रामदास कदम(Ramdas kadam) यांनी प्रत्युतर देत शिवसेना(Shivsena) आणि भाजपसंबधी(BJP) मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे(Uddhav thackray) हे भाजपसोबत युती करण्यास तयार होते, मात्र तिथे संजय राऊत आले आणि सर्व फिसकटले, असं वक्तव्य कदम यांनी केलं. यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकरणात खळबळ उडाली आहे.

ईडीने अटक केल्यानंतर संजय राऊत ज्या प्रकारे हात दाखवून गेले आहेत. त्यावरून संजय राऊत मोठी लढाई लढायला चालल्यासारखे वाटत आहे. ते लढाई जिंकून येतील असं वाटत आहे, असं म्हणत कदम यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, शिवसेनेतून जे फुटले आहेत ते भाजपचे गुलाम झाले आहेत. यावर कदम म्हणाले तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम आहात का याचा विचार करा. तसेच ठाकरे भाजपसोबत युती करण्यास तयार होते,परंतु राऊतांमुळे ही युती होऊ शकली नाही, असं कदम म्हणाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, रामदास कदम यांनी जे.पी. नड्डा(J.P. Nadda) यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. आपण नड्डा यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे कदम यांनी स्पष्ट सांगितले आहे. आता नड्डा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांना न्यायालयाचा दणका, ईडी कोठडीतील मुक्काम वाढवला

‘सगळेच दिवस सारखे नसतात दिवस फिरतात, त्यामुळे…’, उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

‘वार करायचा तर छातीत करायचा, पाठीत कशाला केेला?’, आदित्य ठाकरे आक्रमक

शिवसेनेबाबत जे.पी. नड्डांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More