बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकार टिकवण्यासाठी अजून किती झुकणार?; उद्यानाच्या नामकरणावरून भाजप शिवसेना आमने-सामने

मुंबई | आगामी मुंबई महापालिका निवडणूकांचं बिगूल वाजताना दिसत आहे. त्याचबरोबर मुंबईत राजकीय वारे फिरायला सुरूवात झाली आहे. सर्वच पक्ष राजकीय शक्तीप्रदर्शन करण्यास तयार दिसत आहेत. दावे प्रतीदावे सुरु असताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत दिले होते. त्यातच आता मुंबई महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याचं चित्र आहे.

गोवंडी येथील उद्यानाच्या नामकरणावरून सध्या शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याचं दिसत आहे.  गोवंडी येथील उद्यानाला हैदराबादचा पराक्रमी राजा टीपू सुलतान यांचं नाव देण्याचा प्रस्ताव बाजार समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. परंतु, या नामकरणास आक्षेप घेत भाजपने हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर हा वाद समोर आला होता. भाजपच्या मागणीनंतर देखील समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी हा प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवला होता.

नामकरणास आपला विरोध असून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप सदस्यांनी महापालिकेला दिला आहे. या उद्यानास ‘टीपु सुलतान उद्यान’ असे नाव देण्यास शिवसेनेचा छुपा पाठिंबा आहे का?, असा सवाल देखील भाजपकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. मतांसाठी अजून किती लाचारी करणार आहात? महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी अजून किती झुकणार?, अशी टीका भाजपने केलीये.

टिपू सुलतान हा धर्मांध, क्रूरकर्मा, जुलमी, अत्याचारी व हिंदूद्वेष्टा राजा होता. या उद्यानाला मौलाना आझाद, महामहीम अब्दुल कलाम, हविलदार अब्दुल हमीद अशा भारतमातेच्या थोर सुपुत्रांची नावे देण्यास आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका भाजपने मांडली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; घराच्या बाहेर पडत असाल तर सावधान

“शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देव, धर्म बासणात गुंडाळलेत”

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

“…तर अशा लोकांवर गंगामाईचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही”

“जेव्हा लोक मला शिव्या देत होते, तेव्हा पवार साहेबांनी मला विरोधी पक्षनेता केलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More