बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप-शिवसेनेचं नातं आमीर खान आणि किरण राव यांच्यासारखं”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्यामुळं शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा उलटसुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबद्दल संजय राऊत यांनी शिवसेना व भाजपमधील संबंधांची अभिनेता आमीर खान व किरण राव यांच्या घटस्फोटाशी तुलना केली आहे.

प्रसारमाध्यमांनी शिवसेना-भाजपची युती भविष्यात पुन्हा होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न केल्यावर आता आमीर खान आणि किरण राव यांचं पाहा, रस्ते वेगळे झाले आहेत पण मित्र आहेत, तसंच आहे. आमचे मार्ग बदलले आहेत, पण मैत्री कायम आहे. राजकारणात मैत्री कायम राहील. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवणार असा नाही, असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पुढे राऊत यांनी म्हटलं की, गेल्या अनेक दिवसांपासून मी हेच बोलतोय. आमचे राजकीय मार्ग बदलले आहेत. मात्र नेत्यांमध्ये संवाद कायम आहे. शिवसेना-भाजप म्हणजे काही भारत-पाकिस्तान नाही. आमच्यामध्ये भेटीगाठी होत असतात. चर्चा होत असते.

दरम्यान, शिवसेना-भाजपच्या युतीबद्दल राजकारणात ‘जर आणि तर’ला अर्थ नसतो. काही मतभेद शिवसेना व भाजपमध्ये असतील, पण आम्ही एकमेकांचे शत्रू नसल्याचं फडणवीस म्हणाले होते. राऊत यांना त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी फडणवीसांचं वक्तव्य योग्य असल्याचं सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

नियतीचा खेळ! सासऱ्याचा मृतदेह नेत होता जावई अन्…, एकाच दिवशी माय-लेकी झाल्या विधवा

“विधानसभेच्या काही सदस्यांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या”- भास्कर जाधव

सगळे मरणार, फक्त राजकारणी जिवंत राहणार – प्रविण तरडे

“गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही”

अधिवेशनात गोंधळ घालणार्‍या भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्षांसाठी झाली ‘ही’ कारवाई

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More