भाजपचा गढ असलेल्या ‘या’ भागात शिवसेनेला वर्चस्वाची संधी

भंडारा | भाजपचा गड असलेल्या पूर्व विदर्भात शिवसेनेला वर्चस्व करण्याची संधी चालून आली आहे. भाजपबरोबर असलेली युती तुटल्यामुळे शिवसेनेला आता पक्ष विस्तार करण्याची गरज निर्माण झााली आहे. आतापर्यंत शिवसेनेनं पूर्व विदर्भाकडे दुर्लक्ष केलं होतं.
राज्यात सत्ता स्थापनेनंतर शिवसेनेला महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. आता मंत्रीमंडळ विस्तारात महत्वाचे मंत्रीपद देऊन पूर्व विदर्भात शिवसेना आपले पाय घट्ट रोवण्याच्या तयारीत आहे. बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहे.
विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भात शिवसेनेची पाटी कोरी राहिली. मात्र, भंडारातून नरेंद्र भोंडेकर आणि रामटेकमधून आशिष जयस्वाल हे अपक्ष आमदार निवडून आले. त्यानी, सत्तास्थापनेपूर्वीच शिवसेनेला बिनशर्त पाठींबा दिला आहे.
अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. युतीत मित्र पक्षाला जागा सोडल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून जागा लढवली. त्यात ते निवडून आले. त्यांचे पक्ष संघठन कौशल्य चांगले आहे. त्याचा शिवसेना वाढीला नक्कीच फायदा होईल.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून नितेश राणेंची ‘ती’ मागणी मान्य- https://t.co/fjdCgqixnf
— थोडक्यात (@thodkyaat) December 3, 2019
…म्हणून अजित पवार भाजपसोबत गेले होते; शरद पवारांचा खुलासा https://t.co/erdcz1IiuB @NCPspeaks @AjitPawarSpeaks
— थोडक्यात (@thodkyaat) December 2, 2019
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; आरे पाठोपाठ नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे https://t.co/xaqBQGstKN @ShivSena @uddhavthackeray
— थोडक्यात (@thodkyaat) December 2, 2019