भाजपला जोरदार झटका; हिरे पिता-पुत्राची घरवापसी

नाशिक | नाशिकमध्ये वर्चस्व असलेले हिरे पिता-पुत्रांनी भाजपची वाट सोडून पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपला जोरदार झटका मिळाला आहे. 

माजी मंत्री प्रशांत हिरे आणि त्यांचे पुत्र, भाजप आमदार अपूर्व हिरे य़ांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी असलेला वाद मिटल्यानंतर पिता-पुत्रांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या म्हणजे 7 डिसेंबरला दोघे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर हिरे पिता-पुत्रांच्या प्रवेशाच्या निर्णयामुळे नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-दुष्काळग्रस्तांना मदत करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकार गंभीर नाही- धनंजय मुंडे

-भाजप सरकार संविधानविरोधी आहे- शरद पवार

-राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत- प्रकाश आंबेडकर

-‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’; उदयनराजेंच्या समर्थकांची तोडफोड

-मला असली घाणेरडी गोष्ट करायची नाही; राखी सावंतनं लग्न मोडलं!