मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्ष भाजपावर निशाणा साधलाय. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केलीये.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “कोणत्याही गोष्टीवर टीका करण्याची भाजप पक्षाची सवय आहे. यामध्ये काही लोकं आघाडीवर असून त्यांना भारतरत्न पुरस्कारच दिला पाहिजे.”
भाजपवर टीका करत असताना येत्या काळात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. “आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणतायत. मात्र थोडे दिवस थांबा, काय काय होतंय दिसेलंच,” असं राऊत म्हणालेत.
भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवसेना भवन असेल आणि उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, असा दावा देखील राऊत यांनी केलाय.
थोडक्यात बातम्या-
मुंबई पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनंतर सुरेश रैनाची प्रतिक्रिया, म्हणाला…
कोरोनाची लस घेतल्यावर ‘इतके’ दिवस मद्यपान करता येणार नाही!
“उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना”
मला केंद्रात मंत्रिपद मिळालं तरी…- सुजय विखे-पाटील
कोहलीच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी- गौतम गंभीर