Top News नाशिक महाराष्ट्र

…मग त्या ‘औरंगाबाद’चं नामांतर कधी?; संजय राऊतांनी भाजपला खिंडीत गाठलं!

नाशिक | महाराष्ट्रातील औरंगाबादच्या नामांतरावरुन सध्या राज्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या दरम्यान बिहारमधील औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या नामांतरास स्पष्ट नकार दिला आहे, याबाबत बिहारच्या आणि महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

शुक्रवारी 8 जानेवारी रोजी नाशिकच्या एक्प्रेस इन हॉटेलमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार वसंत गिते, सुनील बागूल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याबाबत भाजप प्रश्न उपस्थित करत आहे. संभाजीनगर हे संभाजीनगरच राहणार आहे, हे नाव हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आहे हे भाजपवाल्यांनी विसरू नये, असं राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बिहार राज्यात औरंगाबाद नावाचा एक मोठा जिल्हा आहे. त्याचेही नामांतर व्हावे, अशी मागणी काही महिन्यांपासून होत आहे.

थोडक्यात बातम्या-

जाता जाता डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठा झटका

रोहित शर्मावर शंका घेणं महागात; ‘त्या’ काकांना काढावी लागली अर्धी मिशी!

‘लस घेतलेल्या लाभार्थ्यांची अशी पटणार ओळख’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर थोरातांनी केला ‘हा’ सवाल

औरंगाबाद नामांतरावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या