Top News देश

‘मत खाणाऱ्यांबाबत भाजपने निर्णय घ्यावा’; नितीश कुमारांचा चिराग पासवानांवर हल्लाबोल

पटणा | बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नितीश कुमार यांनी लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्यावर आपली बाजू मांडली आहे.

“चिराग यांच्या पक्षानं बिहारमध्ये निवडणुका स्वतंत्र लढवल्यामुळे एनडीएला मोठा त्रास सहन करावा लागला. असं असल तरीही एनडीए बहुमतानं बिहारमध्ये आलं आहे. त्यामुळे चिगारबाबत निर्णय देखील भाजपने घ्यावा. मत खाणाऱ्यांच भविष्य भाजपने ठरवावं”, असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री पदाची सुत्रे कोणाकडे जाणार यावरुन चर्चा रंगली असून 16 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

यावर नितीश कुमार म्हणाले की, “मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असेल, याबाबत एनडीए निर्णय घेईल. मी त्यासाठी दावा केलेला नाही. एनडीएची बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल”.

महत्वाच्या बातम्या-

कृणाल पंड्याच्या बॅगेत सापडली महागडी घड्याळं; मुंबई विमानतळावर 3 तास केली चौकशी

“अमृताताई नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका; मानसिक स्वास्थ जपा”

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्र्यांकडे, राज्य सरकारने काढला आदेश

अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत; प्रमोद सावंत

मला मुख्यमंत्रिपदाचा मोह नाही- नितीश कुमार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या