बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागून मनसेशी युती करु नये – रामदास आठवले

पुणे | कोरोना काळात रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने भाजपला भक्कम साथ दर्शवली आहे.

अशातच आता रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने मनसेसोबत न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच यावेळी आठवले यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी देखील केली आहे. पुण्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबत असताना भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करु नये. राज ठाकरे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत असतात. यामुळे भाजपने मनसेसोबत जाणे योग्य ठरणार नाही. भाजपला त्याचा फटका बसू शकतो, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

दरम्यान, जातीनिहाय जनगणना व्हायला हवी. यामुळे जातीभेद वाढणार नाही तर ज्या जाती मागास आहेत त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे अधिक सोयीचे होईल. तसेच दलितांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे, असं देखील आठवले यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

आधी कुत्रा माणसाला चावला मग माणूस कुत्र्याला चावला अन् नंतर…

राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू, मात्र पुणे जिल्ह्यांबाबत अजून शंकाच

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा पुन्हा भडका, या महिन्यातील आज 15वी दरवाढ

‘…यामुळे बॉलिवूड नेहमीच शिक्षा भोगत आलं आहे’, ड्रग्ज प्रकरणात जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य

‘कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा?’, भास्कर जाधवांचा खोचक टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More