Top News महाराष्ट्र मुंबई

“भाजपने मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समाजाची दिशाभूल करणे थांबवावं”

मुंबई | भाजपने मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकारण आणि समाजाची दिशाभूल करण्याऐवजी राज्य सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घ्यायला हवी, असं आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री आणि मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणाबाबत मंगळवारी विधानसभेत माहिती देताना चव्हाण यांनी विरोधी पक्षांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी ते बोलतं होते.

चव्हाण म्हणाले की, “एसईबीसी कायदा करताना तेव्हाच्या विरोधी पक्षांनी तत्कालीन भाजप सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. हा कायदा कोणतीही चर्चा न करता एकमुखाने पारित करण्यात आला होता. आज विरोधी पक्षात असलेल्या भाजपनेही तीच भूमिका घ्यायला हवी. परंतु, त्यांच्या अनेक नेत्यांकडून सरकार गंभीर नाही, सरकारमध्ये समन्वय नाही, अशी धादांत खोटी माहिती देऊन राजकारण केले जाते आहे.”

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी भाजप सरकारनेच नेमलेल्या वकिलांच्या युक्तीवादानंतरही मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळतं असेल तर आम्ही त्याची जबाबदारी फडणवीसांवर सोडून मोकळं व्हायचं का, असा सवालही चव्हाणांनी केला.

थोडक्यात बातम्या-

…तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल- संजय राऊत

मी ऊसतोड कामगाराचाच मुलगा, ऊसतोड कामगारांना विशेष सहाय्य मिळवून देणार- धनंजय मुंडे

आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे- देवेंद्र फडणवीस

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुणे पोलिसांकडून अटक; पाहा काय आहे प्रकरण…

आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत नवीन दर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या