Loading...

भाजपचा रम्या सुसाट; म्हणतो गेल्यावेळी पुतण्यामुळे सत्ता गेली अन् आता काकामुळे जाणार!

मुंबई |  निवडणूक जसजशी जवळ येतीये तसंतसं भाजपचा रम्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जहरी डोस देतो आहे. गेल्यावेळी पुतण्याच्या वक्तव्याने सत्ता गेली होती आणि यावेळी काकाच्या वक्तव्याने सत्ता जाणार असं भविष्य रम्याने वर्तवलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी समोर कुणीच पैलवान नसल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना शरद पवारांनी आक्षेपार्ह हातवारे केले होते. त्यावरच भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीला उत्तर दिलं आहे.

Loading...

धरणात पाणी नाही तर मी… या वादग्रस्त वक्तव्याची शिकवण त्यांना घरणातूनच असल्याचा जोरदार टोला भाजपने लगावला आहे.

अरे हे बारामतीवाले साहेब मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना म्हणाले, कुस्ती ही पैलवानांशी होते, अशांशी नाही आणि हे बालताना चक्क ‘सूचक’ हातवारे केलेत त्यांनी किती घसरलेत साहेब…. तरीच दादा जेव्हा धरण भरण्याची खालच्या पातळीवरची भाषा बोलले तेव्हा मी विचार करयचो की हे येतं कुठून? आता समजलं त्यांची खरी गंगोत्री तर घरातच आहे, असं व्यंगचित्रात म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...