नगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही! भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर

नवी दिल्ली |  संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे नगर दक्षिण. त्याचं कारण देखील तसंच आहे. ऐन निवडणुकीच्या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंचा मुलगा सुजय विखे भाजपवासी झाले आणि दिलीप गांधीचं तिकीट आपोआपच कट झालं.

अपेक्षेप्रमाणे आज संध्याकाळी भाजपने पत्रकार परिषद घेत देशभरातून 182 तर महाराष्ट्रातून 16 नावे घोषित केली. त्यात सुजय विखेंचं नाव अधिकृतपणे घोषित करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री म्हटल्याप्रमाणे, मी त्यांचं नाव केंद्रिय निवडणूक समितीकडे पाठवणार आहे आणि त्यांच्या नावाला मंजूरीही मिळेल, असा मला विश्वास आहे. सुजय विखेंना दिलेला हाच शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला आहे.

नगर दक्षिणमध्ये आता राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विरूद्ध भाजपचे सुजय विखे असा सामना रंगणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…

भाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा

“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?”; या उमेदवारीवरुन मोठा वाद

“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”