Top News महाराष्ट्र मुंबई

“105 जागा निवडून आणण्याच्या गप्पा मारणाऱ्या शिवसेनेला तेवढ्या जागा मिळतील का”

मुंबई | भाजपचे यावेळी 105 आमदार आहेत तर पुढच्या विधावसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावर शिवसेनेला टोला लगावला आहे.

शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीत 105 आमदार निवडून आणण्याच्या गप्पा मारत आहे. परंतू  शिवसेनेला महाविकास आघाडीतून लढण्यासाठी 105 जागा लढण्यासाठी मिळतील का?, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

महाविकासआघाडीत एकत्र निवडणूक लढवताना एवढ्या जागा मिळणार नाहीत, याची मानसिकता शिवसेनेने तयार करावी, असंही उपाध्ये यांनी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसेना हा देशात अजिंक्य असा पक्ष आहे म्हणूनच आम्ही 105 आमदार घरी बसवले असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विक्रोळीमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या आमदाराची ‘ती’ योजना अण्णा हजारेंच्या गावाने स्वीकारली

…अन् टीम इंडियाने 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडीत काढला!

‘विकास योजनांसोबत शत्रूसारखे का वागून महाराष्ट्रद्रोह करताय?’; शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

देशातील कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्धवस्त झालं- राहूल गांधी

“सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या