Top News महाराष्ट्र मुंबई

“राज्य सरकारला विरोध केला तर आम्ही महाराष्ट्र द्रोही, मग केंद्राला विरोध करणारे देशद्रोही का?”

मुंबई |  भाजपने ठाकरे सरकारविरोधात शुक्रवारी राज्यभर आंदोलन केलं. तर त्यांच्या या आंदोलनावर सत्ताधारी शिवसेनासहित राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कोरोनाच्या कठीण काळात राजकारण करत असल्याची टीका करत भाजपला महाराष्ट्र द्रोही म्हटलं. हाच शब्द भाजपच्या जिव्हारी लागला आहे. भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आज यावरूनच ट्विट करून सत्ताधारी शिवसेना राष्ट्रवादी तसंच काँग्रेसला सवाल विचारला आहे.

महाराष्ट्र सरकारला विरोध केला तर आम्ही महाराष्ट्र द्रोही मग जे केंद्र सरकारला विरोध करतात त्यांना देशद्रोही म्हणायचं का?, असा सवाल त्यांनी महाराष्ट्राील महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दुसरीकडे शुक्रवारी भाजपने केलेल्या आंदोलनावरून सोशल मीडियात भाजपला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. भाजपच्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडला. महाराष्ट्रद्रोही भाजप हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेण्ड बनला. अवघ्या काही तासांत हा हॅशटॅग वापरून तब्बल 1 लाखाच्यावर ट्विट करण्यात आले. आजही सचिन सावंत यांनी यावरूनच भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

कोरोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने राज्यभर ‘माझे अंगण, माझे रणांगण’ हे आंदोलन केलं. राज्यभरातील भाजपाचे महत्वाचे नेते करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात ठाकरे सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत रस्त्यावर आले. या आंदोलनावर सत्ताधारी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात आज 92 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज; पाहा किती रुग्ण वाढले!

‘हे यश नाही तर आमच्या सरकारने केलेली निराशा आहे’; ओमर अब्दुल्लांचं इवांका ट्रम्प यांना उत्तर

धक्कदायक! फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या