बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमारला कोठडीत खायला मटण”

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. दिपाली यांनी आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहिली होती त्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्याच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचंं म्हटलं होतं. सरकारने या प्रकरणाची दखल घेत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना निलंबित केलं आहे. तर शिवकुमारला सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला मठण खायला देत असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावती पोलिसांवर केला आहे.

शिवकुमारला पोलीस कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. त्याला कोठडीत पंखा लावून देण्यात आला आहे तसेच त्याला टीशर्ट आणि बर्मुडावर ठेवण्यात आलं आहे, एवढंच नाही तर त्याला खायला मटणाचा डबा देखील दिला जात असल्याचा आरोप शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे. दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत.

दिपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अपर प्रमुख प्रधान संरक्षक रेड्डी यांना ही सुसाईड नोट लिहिली आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये विभागीय वन अधिकारी विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

विनोद शिवकुमार यांनी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट दाखल करण्याची धमकी दिली होती तसेच मला शिव्या देखील दिल्या. त्यांनी नेहमी मला नियम बाह्य काम करण्यास भाग पाडलं, असा आरोप दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी 3 हजार पार!

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

मनोरंजनाच्या पडद्यावर देखील कोरोनाचं सावट ‘या’ शोमधील 18 जणांना कोरोनाची लागण

पैसे थेट खात्यावर जमा करा मग लॉकडाऊनचं बघा- पृथ्वीराज चव्हाण

गिरीश महाजन म्हणाले ईडी आली की कोरोना होतो, आता एकनाथ खडसेंचा पलटवार, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More