महाराष्ट्र मुंबई

चौथीची पोरगी सांगेल, ठाकरे सरकारचं काही खरं नाही- चंद्रकांत पाटील

मुंबई | तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की ठाकरे सरकारचं काही खरं नाही, अशी बोचरी टीका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात सत्तेची हाव लागलीय. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का?, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

सत्तेची हाव इतकी की या खुर्चीला किती काटे आहेत ते आत्ता त्यांना जाणवायला लागलं आहे. पंढरपूरला गेलो तरी आक्षेप, नाही गेलो तरी आक्षेप. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला, तरी सत्तेपायी तो त्यांना चालेलच , असं शब्दांत चंद्रकांत पाटलांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

मुंबईत एवढे मूर्खपणाचे निर्णय घेत आहेत की काही बोलायलाच नको. आजार राहिला बाजूला पण सामान्य माणूस मात्र वैतागला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करणं कठीण, सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते”

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमणार- अमित देशमुख

महत्वाच्या बातम्या-

टिकटाॅक बंद झाल्यानं 2 बायकांसह धुळेकर उद्ध्वस्त; आतापर्यंत इतक्या लाखांची कमाई!

फडणवीसांनी दोन तासात कितीतरी प्रश्न सोडवले असते- चंद्रकांत पाटील

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची पोलिसांकडून होणार चौकशी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या