बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली, त्यावर मोदींनी कळस चढवला”

मुंबई | भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूर विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला आहे. नागपूरमध्ये बावनकुळे यांचा एकतर्फी विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील भाष्य केलं आहे.

वर्षानुवर्ष मेहनत घेऊन भाजपने ही वोटबँक तयार केली आहे. ही वोटबँक संत-महंतांपर्यंत पोहचते. शिवाजी महाराज यांनी हिंदुत्वाची वोट बँक तयारी केली, त्यामध्ये अलीकडे अटलजी, अडवानी, मोदी यांनी त्यावर कळस चढवला, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे वोटबँक ही पक्षाची असते आणि तिकीट देखील पक्षाचं असतं, असंही पाटील यावेळी म्हणाले आहेत.

एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्व पाहून त्याला तिकीट दिलं जातं. त्यामुळे भाजप उगाचत कोणावर अन्याय करत नाही, असंही ते म्हणाले आहेत. तयार झालेल्या वोटबँकचा उपयोग हा सर्वांनाच होतो. तिकीट कापलं म्हणून नाराज अशी कार्यपद्धत भाजपात नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आयुष्यात त्या दिवशी काय प्रसंग आला होता त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या कुटुंबांनी हे विष पचवलं होतं. आता त्यांना त्याचं हे यश मिळालं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“प्रकरण बाहेर आलं तर फटाक्यांची माळ लागेल”, राज ठाकरेंचा नेमका रोख कुणाकडे?

“कोण कोणाला सडवतोय हे आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल”

ठाकरे सरकार पडणार का?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं…

मनसेचा अजेंडा काय? राज ठाकरे म्हणतात, “सध्या आघाडीचे दिवस पण…”

भाजपच्या 12 आमदारांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More