बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, खुर्ची टिकवण्यासाठी…”

सातारा | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी आहेत, तसच खुर्ची टिकवण्यासाठी राऊत काहीही करतील असा घणाघातही चंद्रकातं पाटलांनी केला आहे.

चंद्रकात पाटील हे काल सातारा जिल्ह्यातील फलटण दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना संजय राऊतांनी राहूल गांधीची भेट घेतल्याबद्दल प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना त्यांनी संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी आहेत. राऊत ममता बॅनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात आणि दिल्लीत गेले की राहूल गांधीच्या सुरात सुर मिसळतात, अशी टिका त्यांनी केली आहे.

शिवाय पुढे त्यांनी संजय राऊत खुर्ची टिकवण्यासाठी काहीही करू शकतात असा घणाघात त्यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी यूपीए कुठे आहे असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी राऊत त्यांच्या बाजूने होते. मात्र तिकडून सोनिया गांधीनी डोळे वटारले असतील, म्हणून संजय राऊत लगेच त्यांची समजूत घालायला दिल्लीत गेले असतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात आल्यानंतर राहूल गांधी यांच्यासह काँग्रेसवर जहरी टीका केली होती. राहूल गांधी हे वर्षातील सर्व दिवस परदेशातच असतात, असाही टोला त्यांनी लगावला होता.

थोडक्यात बातम्या-

“ख्रिसमसदिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार”

‘..अन्यथा रस्त्यावर फिरकूही देणार नाही’; पडळकर कडाडले

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

भर रस्त्यावर 8 वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

“…मग तुमच्याविरोधात कारवाई का करू नये?”, न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More