ब्राह्मण समाजातील एक वर्ग मोठ्या प्रमाणात गरीब, म्हणून भाजपने… – चंद्रकांत पाटील
मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्यास नकार देत मराठा आरक्षण कायदा रद्द केला. त्यानंतर महाराष्ट्रात आरक्षणावरून राजकारण तापत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी महाराष्ट्र दौरा चालू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 4 वेळा पत्र लिहून सुद्धा त्यांनी वेळ दिला नाही, असं संभाजीराजे यांनी सांगितलं होतं. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारची पाठराखण केली आहे.
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार संभाजीराजे यांच्यात भेट होऊ शकली नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर केंद्र सरकारची पाठराखण केली आहे. विनायक मेटे यांनी आपली बाजू मांडली आहे. आंदोलन झालं तर भाजप देखील भाजपचे झेंडे सोडून आंदोलनात सामिल होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांविषयी चिंता व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजासाठी अमृत महाडमंडळाची स्थापना केली. पण ते अजूनही सुरुच झालेले नाही. यामध्ये सरकारच्या दुरदृष्टीचा अभाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासाठी अनेक पत्र पाठवण्यात आली. मात्र यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालं नसल्याचं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ब्राह्मण समाजातील एक वर्ग हा मोठ्याप्रमाणात गरीब आहे. पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला नियमित आर्थिक उत्पन्न नाही. त्यामुळे भाजपकडून ब्राह्मण कीर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्या समाजाला अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच”
बारावीच्या परिक्षेसंदर्भात ‘या’ राज्यानं केली मोठी घोषणा; विद्यार्थी घरबसल्या देणार पेपर
इंडिया VS पाकिस्तान सामन्यावर यंदाही विर्जन; टीम इंडियाची आणखी एक स्पर्धा रद्द
डोळ्यात मिरची पावडर फेकून 19 लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न; 40 CCTV तपासल्यानंतर आरोपी अटकेत
पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता!
Comments are closed.