बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे अजित पवारांना माहिती”

पंढरपूर | गेल्या 2 वर्षांपासून महाविकास आघाडीचं सरकार लवकरच पडेल, अशी वक्तव्य भाजप करत आलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री सरकार पाच वर्षे चालेल असं सातत्यानं सांगत आले आहेत. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

खरंतर सरकार पडणार आहे याची अजित पवारांना जाणीव आहे. कधी आणि कसं पडणार हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळं त्यांनी उगाच खोटा आव आणू नये, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. अजित पवारांनी जास्त गमजा मारण्याची गरज नाही. कालचक्र हे कायम फिरत असतं. माणसानं नम्र राहून नीट बोलायला हवं. सरकार पडणार नसेल तर ते इतका आकांडतांडव कशासाठी करत आहेत? आजार झालेलाच नसेल तर तो झाला नाही असं सांगत फिरण्याची काय गरज आहे, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

अजित पवार यांनी पंढरपुरातील सभेत काल भाजपला सरकार पाडून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. राज्यातील सरकार पाडणं म्हणजे काय खेळ वाटतो काय?, हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येड्या गबाळ्याचे काम नाही, असं म्हणत अजित पवार यांनी भाजपला सुनावलं होतं.

दरम्यान, पंढरपूरच्या प्रचारात अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख ‘चंपा’ असा केला होता. त्यावरूनही पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. मला चंपा म्हणणं यांनी पुन्हा चालू केलं आहे. आता मलाही त्यांच्या मुलांपासून सर्वांचे शाॅटफाॅम वापरावे लागतील, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

कचऱ्यात सापडलेल्या मुलीला अभिनेत्री स्वरा भास्करने घेतलं दत्तक!

चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे- अजित पवार

“मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय”

पुणे हादरलं! निवृत्त पोलीस अन् गुन्हेगारात वाद झाल्यानंतर गुन्हेगाराचा विचित्र मृत्यू

संजय राऊतांनंतर राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर बेळगावात, मराठी माणसाचा प्रचार करणार!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More