बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राने आज 3 पक्षांचा तीन पैशाचा तमाशा पाहिला – चंद्रकांत पाटील

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. नारायण राणे यांनी अटक झाल्यानंतर शिवसेनेने एकच जल्लोष केला आहे. तर दुसरीकडे भाजपने आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारविरूद्ध आंदोलन केलं आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

महाराष्ट्राने आज 3 पक्षांचा 3 पैशांचा तमाशा पाहिला. जन आशीर्वाद यात्रेला लोकांनी जनार्दनाने भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे पोटदुखी झालेल्या मविआ सरकारने ही हीन पातळी गाठली आहे. केंद्रीय मंत्र्याला अटक करून लोकशाहीची क्रूर हत्या करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध करावा तितका कमीच आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोकण हा केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा बालेकिल्ला आहे. राणेसाहेब कोकणात निधड्या छातीने टक्कर देतात, याचा शिवसेनेला राग आहे, असा आरोप देखील त्यांनी केलाय. त्यामुळे राज्याची मान खाली गेली तरी चालेल, राणेंना अटक करायचीच, या सूडबुद्धीने मविआ सरकारने कारवाई केली. आघाडीतल्या दोन घटकपक्षांचं कारवाईला समर्थन आहे का?, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारला आहे.

दरम्यान, संसदेसह प्रदीर्घ विधिमंडळ कारकीर्दीचा अनुभव असलेले शरद पवार मविआ आघाडीचे शिल्पकार आहेत. लोकशाही मूल्ये मानणाऱ्या पवार साहेबांच्याच पक्षाकडे महाराष्ट्राचे गृहखाते आहे. राणेसाहेबांच्या अटकेसाठी शिवसेनेने गृहमंत्र्यांनी परवानगी घेतली होती? पवारसाहेब यावर काही बोलतील का?, असे प्रश्न देखील चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी साजरी केली दिवाळी; पाहा व्हिडीओ

“नारायण राणेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना शॉक द्या”

‘सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करू’, शिवसेनेला भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

वरूण सरदेसाई यांची पोलिसांना शिवीगाळ???; व्हिडीओ ट्विट करत मनसेचा गंभीर आरोप

“एक मिनिट साहेब जेवतायेत”; …अन् जेवत्या ताटावरून नारायण राणेंना अटक, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More