बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस जे बोलले ते त्यांनी सत्तेत येताच केवळ 20 दिवसात करून दाखवलं”

मुंबई | ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. राज्यातील निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुढील 2 आठवड्यात राहिलेल्या निवडणुका प्रक्रिया जाहीर करा, असं सांगण्यात आलं आहे. या निर्णयावरुन भाजप शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे. मात्र यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झालीये. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नव्या सरकारच्या स्थापनेनंतर 20 दिवसात ओबीसीचा (OBC) निर्णय दिल्याने चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. अडीच वर्ष वाया घालवणाऱ्या मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेऊ नये, असं त्यांनी सांगितल.

सत्तेची सुत्रे हातात आल्यानंतर 4 महिन्यात ओबीसी आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून सन्यास घेईन अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ती त्यांनी पू्र्ण केली याची आठवण ही पाटलांनी करून दिली. शिंदे-फडणवीस सत्तेत मराठा आरक्षण, धनगर समाज आरक्षण, अनुसूचित जाती- जामातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण हे प्रश्नही सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मविआ सरकारमुळे त्यांच्या बेफिकरिमुळे राज्यात अनेक ठिकाणी निवडणुका पार पडल्या. भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद आणि 106 नगरपंचायतीच्या निवडणुका तसंच हजारे ग्रामपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या. आता ओबीसी आरक्षणाचं श्रेय घेणाऱ्या मविआने याचं उत्तर द्यावं,  असंही ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या

‘…तर महिन्याला 5000 रूपये पेंशन मिळेल’; सरकारची भन्नाट योजना

‘उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर…’; पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

कोर्टाच्या सुनावणीनंतर दीपाली सय्यद यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

e-Aadhar संदर्भात ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?; जाणून घ्या एका क्लिकवर

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More