बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अशोक चव्हाण यांना कायदा कळत नाही, वेड पांघरून पेडगावला जात आहे”

मुंंबई | मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकारण तापू लागलं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या पारड्यात टाकला आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला मदत  करावी, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली होती. त्यानंतर आता त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

राज्याच्या महत्त्वाच्या विषयात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार वारंवार आपली जबाबदारी झटकत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही तोच प्रकार घडत आहे. परंतु, मराठा समाज हे सहन करणार नाही. घटनेच्या 102 व्या दुरुस्तीनंतरही राज्यात एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचा राज्य सरकारचा अधिकार आणि जबाबदारी कायमच आहे. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने जबाबदारी पार पाडावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अशोक चव्हाण यांना कायदा कळत नाही, मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते आता वेड पांघरून पेडगावला जात आहे. ते आता केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. इतके वर्ष केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकार याबाबतीत जबाबदारी झटकू शकत नाही. आताही चेंडू तुमच्याच अंगणात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खापर फोडून किंवा केंद्र सरकारकडे चेंडू ढकलून तुम्ही मोकळे होऊ शकणार नाही, असंही पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रोखण्यासाठी आता एकमेव पर्याय; राहुल गांधींच्या ‘या’ मागणीने धरला जोर

मुंबई विमानतळावर एअर अॅम्ब्युलन्सची इमर्जन्सी लँडिंग; पाहा व्हिडीओ

…अन् लातुरात चक्क मृतदेहांची अदलाबदल; एकाच मृतदेहावर दोन वेळा अंत्यसंस्कार!

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियात बदली!

कोरोना पॉझिटिव्ह नवरा अन् गुडघ्याला बाशिंग; कोरोनाबाधित असतानाही नवरदेव चढला बोहल्यावर, अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More