Top News कोल्हापूर महाराष्ट्र

भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आजी प्रदेशाध्यक्षांचं स्पष्टीकरण; चंद्रकांत पाटील म्हणाले…

कोल्हापूर | शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. दानवेंच्या या वक्तव्यामुळे भाजपला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हे शेतकऱ्यांचं म्हणूनच पाहिलं पाहिजे. यामध्ये बाहेरील शक्ती असेल तर त्याकडे गृह विभागाने लक्ष दिलं पाहिजे. दानवे काय म्हणाले हे त्यांचं वैयक्तिक मत असून ते भाजपचं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

कृषी विधेयकावर देशातील शेतकरी नाराज नाहीत. कारण महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये कुठेही आंदोलन नाही त्यामुळे शेतकरी नाराज आहेत समजायचं कसं?, असं पाटील म्हणाले. दरम्यान दानवेंच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निशाणा साधत सर्जिकल स्ट्राईकची मागणी केली.

जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार करून सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लस घेतल्यानंतर मद्यपान करता येणार नाही; नियमावली जाहीर

अरारारारा… खतरनाकssss पुन्हा होणे नाही, माझा हक्काचा संगीतकार गेला- प्रविण तरडे

चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करा- संजय राऊत

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवरच्या खटल्याला कोर्टाकडून ‘तारीख पे तारीख’; या तारखेला होणार सुनावण

‘बायकोने बजावलंय मेव्हण्याच्या लग्नाला आला नाहीत तर…’; सुट्टीसाठी पोलिसाने केला अनोखा अर्

‘…तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या’; भाजपचं राष्ट्रवादीला आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या