बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वेळ पडल्यास शिवसेनेमध्ये नाराज असलेल्यांना घेऊन निवडणूक लढवू”

कोल्हापूर | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील (BJP Leader Chandrkant Patil) हे सध्या कोल्हापूर मध्ये आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ते कोल्हापूरला गेले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी चंद्रकातं पाटलांनी चांगलीच कंबर कसल्याचं दिसून आलं आहे. वेळ पडल्यास शिवसेनेमध्ये नाराज असलेल्यांना घेऊन निवडणूक लढवू, असा इशाराच त्यांनी दिला आहे. शिवाय या निवडणुकीमध्ये भाजपला 2 जागा दिल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम  विश्वासही चंद्रकातं पाटलांनी व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला राज्यपालांचे आदेश न पाळण्यावरूनही सुनावलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या हे लक्षात आलं पाहिजे की राज्यपाल हे संविधानिक प्रमुख पद आहे. मात्र राज्य सरकार वारंवार राज्यपालांच्या आदेशाचा अवमान करत आहे. हे सरकार राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या दृष्टीने सर्व गोष्टी करत असल्याचा टोला पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपने 9 जागांसाठी अर्ज केले आहेत. अशा निवडणूका बिनविरोध करणंच चांगल असतं, असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे एकंदरीत आता या निवडणुकांकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अखेर चिंता मिटली! Omicron बाबत दिलासादायक माहिती आली समोर

एसटी संप मागे! संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची मोठी घोषणा

म्हाडाची परिक्षा ऑनलाईन पद्धतीनेच; पेपर फुटीनंतर नवी तारीख जाहीर

‘…कदाचित खूप उशीर झाला आहे’; Omicron बाबत धक्कादायक माहिती आली समोर

पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकारची मोठी कारवाई; आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More