बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”नेतेगिरी म्हणजे लुटणं नाही, फॉर्च्युनरने चिरडण्यासाठी मी राजकारणात आलो नाही”

नवी दिल्ली | लखीमपूर खीरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी विरोधक करत होते. त्यानंतर अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आता विरोधकांनी अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची बाजू उचलून धरली आहे. अशातच आता योगी सरकारला घरचा आहेर मिळाला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी लखीमपूर खीरी प्रकरणावरून भाजपच्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. नेतेगिरी म्हणजे कुणालाही लुटणे नाही. आम्ही राजकारणात लुबडण्यासाठी तसेच फॉर्च्युनरने कुणालाही चिरडायला आलो नाही. तुम्हाला तुमच्या वर्तनामुळेच मते मिळणार आहे. तुम्ही राहता त्या परिसरात जर दहा लोकांनी तुमची स्तुती केली तर माझी छाती रूंद होईल. असं नाही झालं पाहिजे की, तुम्ही घराबाहेर पडताच लोक तुमच्यापासून दूर जातील, असंही देव सिंह यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

लखीमपूर खीरीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, तसेच कोणत्याही दबावाखाली कारवाई केली जाणार नाही. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर स्वतंत्र देव सिंह यांनी वक्तव्य केलं आहे. याप्रकरणी अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक करण्यात आली.

दरम्यान, सरकार तळागाळापर्यंत पोहचत आहे. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही आहे लखीमपूर खीरी प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा दिली जाणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

फक्त 6 रुपये घेऊन मुंबईत आला, मात्र त्यानंतर ‘मिस्टर बजाज’ने गाजवली बाॅलिवूड इंडस्ट्री

‘कुणी मला सांगेल का?, आज वसुली चालू आहे की बंद?’; अमृता फडणवीसांचा खोचक टोला

“आजचा ‘महाराष्ट्र बंद’ म्हणजे सरकारचा पुरस्कृत दहशतवाद”

“माझा मुलगा 11 वर्षांचा असताना अचानक गेला, त्यावेळी फक्त शाहरूख खान…”

लग्नासाठी धर्मांतर करणारे हिंदू लोक हे…- मोहन भागवत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More