बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यावेळी मात्र या सरकारला लकवा मारतो’; भाजप नेत्याची बोचरी टीका

मुंबई | ओमिक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Varient) धास्तीने पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबत सरकारचा संभ्रम उडाला आहे. 1 डिसेंबर शाळा सुरु होणार असं नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. मात्र, सरकारने शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक सस्थांकडे ठेवला आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Leader Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

केशव उपाध्ये म्हणाले, 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचे जाहिर करूनही पुन्हा याबाबत निर्णय घेण्याचे ओझे स्थानिक सस्थांवर टाकून राज्याची शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव ठाकरे सरकारचा आहे, असा घणाघात करत, ‘या धोरण लकव्यामुळे गेल्या दोन वर्षांत शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, सत्तेवर आल्यापासून ठाकरे सरकारने महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याच चंग बांधला आहे. शाळेला टाळे लावण्याच्या या खेळामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दारूची दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारला शिक्षणविषयक निर्णय घेताना लकवा मारतो, अशी टीका त्यांनी केली आहे. याशिवाय त्यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर या अपयशाचे खापर फोडण्याचा डाव शिवसेना आणि राष्ट्रवादीने आखला असल्याचा आरोपही केली आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नविन व्हेरीयंट ओमिक्रॉनने धुमाकुळ घातला आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेला एक तरूणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एखदा सरकारने ओमिक्रॉनच्या विरोधात कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक सस्थांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली

मोठी बातमी! उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

kunal Kamra म्हणतो, “मी एक कोरोना व्हायरस आहे म्हणून…”

Gold Rate: लग्नसराईत स्वस्त सोने खरेदीची संधी, जाणून घ्या नवे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More