Top News मनोरंजन राजकारण

ना भूले है, ना भूलने देंगे, भाजपने छापले सुशांतचे स्टिकर्स

पटना |  सुशांत सिंग राजपूत आत्महत्येसंदर्भात सध्या वातावरण तापलंय. यातच बिहारमध्ये हा मुद्दा अधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे. भाजपच्या आर्ट कल्चर सेलचे बिहार संयोजक वरूणकुमार सिंह यांनी सुशांतच्या फोटोचे स्टिकर्स छापले आहेत.

भाजपने छापलेल्या या स्टिकर्सवर सुशांतचा एक हसरा फोटो असून त्यावर ‘ना भूले है, ना भूलने देंगे’ असं लिहिण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जस्टिस फॉर सुशांत असं या स्टिकर्सच्या वरील बाजूला लिहिलेलं आहे. या स्टिकरवर भाजपच्या निवडणूकीचं चिन्ह कमळ सुद्धा आहे.

वरूणकुमार सिंह यांच्या सांगण्यानुसार, सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अभियान सुरु केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी करणी सेनेने देखील स्टिकर्स आणि मास्कचं वाटप केलं आहे.

दरम्यान सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा याला अटक करण्यात आली. तर आता एनसीबीने सुशांतचा नोकर दिपेश सावंत यालाही अटक केली आहे. उद्या दिपेशला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही”

भारतीय जवानांकडून माणुसकीचं दर्शन; सीमेवर रस्ता भरकटलेल्या चिनी नागरिकांचे वाचवले प्राण

“इतर देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य, मग भारत का अयशस्वी?”

पांडुरंग रायकरांच्या मृत्यूप्रकरणी जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल- अजित पवार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या