बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्रीच पायघड्या घालतात, ‘ती’ भेट घेऊन शिवसेनेनं महाराष्ट्र द्रोह केला”

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्पष्ट बहुमताच्या जोरावर केंद्रात भाजपचं एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. परिणामी देशभरातील विरोधी पक्षांना (Opposition Party) भाजपचं वर्चस्व मोडित काढण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Of West Bengal) या मोेदी विरोधकांची मोट बांधण्यासाठी विविध राज्यांचा दौरा करत आहेत. त्यांच्या महाराष्ट्र (Maharashtra Tour) दौऱ्यावरून राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

देशाची पुढील लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आहे पण आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी चालू झाली आहे. नरेंद्र मोदी यांना पर्यायानं भाजपला रोखण्यासाठी देशातील गैरभाजप पक्षांनी एकत्रित येण्याची गरज सध्या राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत. अशातच ममता बॅनर्जी यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतल्यानं भाजपकडून शिवसेनेवर (Shivsena) जहरी टीका करण्यात येत आहे.

शिवसेनेतर्फे राज्याचे राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray)  यांनी ममता यांची भेट घेतल्यानं भाजपकडून टीका करण्यात आली आहे. ममता यांच्या स्वागतासाठी राज्याचे राजशिष्टाचार मंत्रीच पायघड्या घालत होते. ममता बॅनर्जी याची भेट घेऊन शिवसेनेनं महाराष्ट्र द्रोह केला आहे, अशी घणाघाती टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Mumbai BJP President Ashish Shelar) यांनी केली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरून सध्या राज्यासह देशातील राजकारणात खळबळ माजली आहे. ममता यांनी काॅंग्रेस आणि युुपीएबद्दल केेलेल्या वक्तव्यावरून काॅंग्रेसनं ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या 

महाराष्ट्रातील ‘या’ शहराचं टेंशन वाढलं, नायजेरियातून आलेल्या मायलेकी पॉझिटीव्ह

“मी मेल्यानंतर…..” सर्वांना हसवणाऱ्या कुशल बद्रिकेची भावनिक पोस्ट

मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, मात्र ‘या’ कारणामुळे घरीच राहणार?

ॲमिटी विद्यापीठाचं मोठ पाऊल, अमेरिकेतल्या तीन विद्यापीठासोबत करार

‘माझ्यासोबत त्याला शारिरीक संबंध ठेवायचे होते…’; प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More