बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे’; पुण्यातील मिनी लॉकडाऊनला भाजपचा कडाडून विरोध

पुणे | वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लावण्यात आले. बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार आहे. मात्र, बस आणि हॉटेल्स बंद ठेवण्याच्या निर्णयाला भाजपनं तीव्र विरोध दर्शवला आहे.

भाजपकडून जमावबंदीच्या पहिल्याच दिवशी जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी पोलिसांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भुमिका मांडली. संध्याकाळी 6 वाजेपासून सुरु होणाऱ्या संचारबंदीला विरोध करताना रात्री 8 पासून संचारबंदी करा, अशी मागणीही बापट यांनी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी कायदा घातात घेऊ नये. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लाठीमार न करता थेट गुन्हे दाखल करा, अशी मागणी बापट यांनी केली आहे. पोलिसांनी दक्षता समिती, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. शिस्त पाळून समाजजीवन सुरु राहायला हवं. लोकांना रेशन द्या. काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे याला अर्थ नाही, अशी टीकाही गिरीश बापट यांनी केली.

थोडक्यात बातम्या- 

रुग्णसंख्या वाढली, कोरोना बळीही वाढले, कोरोनाचा कहर; ‘या’ देशात संपूर्ण लाॅकडाऊन घोषित

“…तर 30 एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडणं शक्य आहे”

मी भारताचा पंतप्रधान असतो तर…- राहुल गांधी

“माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत”

सचिन वाझे यांच्या प्रकृतीला धोका, वैद्यकीय तपासणीत ‘ही’ धक्कादायक बाब उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More