Top News महाराष्ट्र मुंबई

‘कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबा पण…’; सुधीर मुनगंटीवार अधिवेशनात आक्रमक

मुंबई | हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होताच विरोधी पक्षाने गोंधळ घालण्यास सुरू केली. सभागृहात कामकाज सुरूहोण्याअगोदरच भाजप नेते सुधीर मुगंटीवार यांनी कामकाजाच्या नियमावलीवरून संताप व्यक्त केला.

कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही पण सभागृहात घुसू शकणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था केली त्याबद्दल अभिनंदन, पण याची नियमावली ठरवणार आहात की नाही. कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

आपण महाराष्ट्र विधानसभेच्या 180 पानांचं नियमांचं पुस्तक दिलं. 320 नियम त्यामध्ये आहेत. अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. करोना, करोनाचा बाप, करोनाचा आजोबाही विचार केला तरी सभागृहात घुसू शकणार नसल्याचं मुनगंटीवार  म्हणाले.

दरम्यान, अधिवेशनाला सुरूवात होण्याअगोदर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सभागृहाच्या परिसरात ढोल बांधत पाठीला मागण्यांचा बोर्ड लावला होता. त्यांचा हा बोर्ड पोलिसांनी मोडला. त्यानंतर पडळकरांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

थोडक्यात बातम्या-

“मोदी सरकारचे धोरण नको तिथं बोलायचं आणि हवं तिथं हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं”

विश्वासघात करुन सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारची दादागिरी चालू देणार नाही- गोपीचंद पडळकर

‘ठाकरे सरकारचा सत्यनाश झाला पाहिजे’; निलेश राणेंची जहरी टीका

हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट, ‘इतक्या’ जणांना झाली कोरोनाची लागण

आज पासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात, आज ठाकरे सरकार 6 अध्यादेश आणणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या