तीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक

नवी दिल्ली | भाजपनं पाच राज्यांच्या निवडणुकीतील पराभवाचा धसका घेतला असून पक्षसंघटनेतील मोठ्या नेत्यांची सात तासांची बैठक आयोजीत केली आहे.

बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन राज्यात भाजपचा पराभव झाल्यामुळं या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

निवडणुकांतील निकाल आम्ही नम्रपणे स्विकारतो आणि जय-पराजय हा जीवनाचा भाग आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधील 65 लोकसभा मतदारसंघापैकी 62 मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. 

महत्वाच्या बातम्या 

“इतर राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”

-डिलिव्हरी बाॅयच्या व्हायरल व्हीडिओनंतर झोमॅटोचा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

-राम मंदिरासाठी शिवसेना आक्रमक; लोकसभेत मांडला मुद्दा

-प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

-…म्हणून ‘हॉकी इंडिया’च्या सीईओंनी त्या खेळाडूंना चक्क हाकलून लावलं!