“हे समजत असतं तर राहुल गांधींना पप्पू उपाधी मिळाली नसती”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान ज्या प्रकारे राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सत्ताधारी पक्षावर आरोपांची फैरी झाडली त्यावेळी सर्वांना वेगळेच राहुल गांधी पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Pm Narendra Modi) सवाल केले. अदानींचं नाव घेत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. याला नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) लोकसभेत बोलताना प्रत्युत्तर देखील दिलं. मोदींचं हे भाषण प्रचंड व्हायरल होत आहे.

मोदींनी दिलेल्या उत्तरानंतर भाजपनेही (Bjp) राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलंय. अनेक भाजप नेत्यांनी काँग्रेस (Congress) आणि राहुल गांधींची खिल्ली उडवली. आता भाजपच्या ट्विट हँडलवरून राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका करण्यात आली आहे.

सूट-बूट की सरकार, ‘हम दो,हमारे दो’ या टोमणेबाजीतच विरोधीपक्षाची साडे 8 वर्ष गेली. देशाच्या पंतप्रधानांनी मुक्तहस्ते दिलेल्या पाठिंब्याने, उद्योग वाढणे हे देशासाठी सकारात्मक. रोजगार निर्माण होऊन देशाचे उत्पन्न वाढते. पण हे समजत असते तर राहुल गांधीला ‘पप्पू’ उपाधी मिळाली नसती, असा खोचक टोला भाजपने राहुल गांधींना लगावला आहे.

जर अडाणी ग्रुपला सहकार्य करणं गुन्हा असेल, तर सर्वात मोठे गुन्हेगार काँग्रेसच ठरेल. अदानींचा उदय तसेच त्यांचं काँग्रेसशी असलेले संबंध समजण्यासाठी आपल्याला काही दशके मागे जाण्याची गरज आहे. कोणताही उद्योगपती जन्मत: मोठा होत नसतो. त्यामागे खूप मोठा संघर्ष, मेहनत आणि त्याग असतो, असं ट्विटमध्ये भाजपने म्हटलंय.

अदानी समूहाला अलीकडच्या वर्षांत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी भरपूर मदत केली आहे. तथापि, ज्यांनी अदानीला मोठे होण्यास मदत केली तेच लोक मोदी सरकारवर हल्ला करण्यासाठी अदानी यांच्यावर जोरदार हल्ला करत आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-