Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

“सुशांत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न”

मुंबई | 80 हजार बनावट खाती उघडून त्या माध्यामातून पोलिसांना बदनाम करण्याचा कट उघडकीस आला आहे. यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप केलाय.

मुश्रीफ म्हणाले, ही बनावट खाती भाजपकडून चालवली जात असल्याची माहिती आहे. भाजपकडून ठाकरे परिवाराला बदनाम करणं तसंच मुंबई पोलिसांना शिवीगाळ करणं हे प्रकार या माध्यमातून केले गेलेत.

सुशांतच्या प्रकरणातही या पद्धतीचा प्रकार झाल्याचं दिसून येतंय. जाहिरातीचं उत्पन्न मिळवण्यासाठी ‘टीआरपी’ वाढवण्याचा गैरप्रकारही पुढे आलाय. आता चौकशीतून या सर्व चुकीच्या गोष्टी उघडकीस येतील, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई विद्यापीठाचा गोंधळ सुरुच; एकीकडे परीक्षा रद्द तर दुसरीकडे वेळापत्रक पोहोचलं

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट शेतकरी संघटनांशी चर्चा करावी”

…म्हणून ‘आज तक’ला एक लाखांचा दंड; ‘या’ 3 चॅनल्सना माफी मागण्याचे आदेश

कंगणा राणावत पुन्हा अडचणीत, ‘या’ कारणामुळे कोर्टानं दिला गुन्हा दाखल करण्याचा आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या