पुणे | पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्षे भाजपचा वरचष्मा आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपसमोर महाविकास आघाडीचे मोठे आव्हान असणार आहे.
भाजपने सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख हे तगडे उमेदवार मैदानात उतरवले असून राष्ट्रवादीकडूनही सांगली जिल्ह्यातीलच अरुण लाड यांच्या रुपाने तोडीस तोड उमेदवार देण्यात आला आहे.
अर्ज छाननीच्या दिवशी (दि.१३) वैध ठरलेल्या १०० उमेदवारांमध्ये भाजपच्या संग्राम देशमुख यांच्यासोबत “संग्राम देशमुख” नावाच्याच अजून एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीत वैध ठरला असल्याने भाजपची कमान सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या डोकेदुखीत चांगलीच वाढ झाली आहे.
गतवेळी चंद्रकांत पाटील हे केवळ २३८० मतांनी विजयी झाले होते, त्यामुळे त्यांना या निवडणुकीचे महत्व माहीत आहे. आपल्या उमेदवाराचे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारामुळे निवडणुकीत तोटा होऊ नये म्हणून भाजप नेते त्या “संग्राम”ला संपर्क साधण्यासाठी दुपारपासून प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. परंतु संबंधित उमेदवाराचा फोन “नॉट रीचेबल” असल्याने त्यांची डोकेदुखी अजून वाढणार असेच दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
“…राहुल गांधी शाळेतील वाईटातले वाईट विद्यार्थी, काँग्रेस नेते एकाच कुटुंबामागे कधीपर्यंत धावणार?”
“दानवे येऊन जाऊन बाप काढतात, दानवेंना विचारा त्यांचे बाप कोण आहे, कोणाचे बाप, किती बाप?”
सोमय्यांनाआरोप करण्याचे अधिकार, शिवसेनेनं ते खोडावेत- चंद्रकांत पाटील
संन्यास घेण्याचं बोललोच नाही- नितीश कुमा
“सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम, शॉक दिल्याशिवाय बेताल बडबड थांबणार नाही