Maharashtra l महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं जोमानं वाहतं आहे. अशातच आता राज्यातील अनेक ठिकठिकाणी नेत्यांच्या जाहीर सभा देखील पार पडत आहेत. या सभेदरम्यान राज्यातील दिग्गज नेत्यांनी जाहीर सभांमध्ये केलेली विधानं प्रचंड गाजत आहेत. असं असतानाच आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या भाषणावर भाजप पक्षाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.
विजय वडेट्टीवारांच्या अडचणी वाढल्या :
काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाषणादरम्यान शिवीगाळ केल्याचा आरोप भाजप पक्षाकडून करण्यात आला आहे. यावेळी विजय वडेट्टीवार यांच्या भाषणाचा व्हीडिओ देखील भाजप पक्षाने ट्विट केला आहे. यावेळी विजय वडेट्टीवार यांच्या विधानावरून काँग्रेसला घेरलं आहे. त्यामुळे आता विधानसभेला जनताच काँग्रेसला धडा शिकवेल असं भाजपकडून म्हणण्यात आलं आहे.
काँग्रेसचा हात, मतदारांचा घात
कॉंग्रेस नेते, @VijayWadettiwar मतदारांना हरा*खोर म्हणत आहे, 20 तारखेनंतर तुला पाहून घेइन, तुमचे नाव लिहून ठेवले आहेत. अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे.
लोकशाहीत मतदार हा राजा असतो मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला… pic.twitter.com/pfwi8apMi8
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 6, 2024
Maharashtra l व्हीडिओमध्ये नेमकं काय आहे? :
यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी शिवीगाळ केली आहे. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी हरामखोर, भडवे, नालायक म्हणत मतदारांना जाहीर शिवीगाळ केली आहे. त्यामुळे आता विजय वडेट्टीवार यांचा वादग्रस्त व्हीडिओ भाजपने ट्विट देखील केला आहे.
यावेळी काँग्रेसचा हात, मतदारांचा घात… असं म्हणत भाजप पक्षाने विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. यासंदर्भात भाजपने आपल्या एक्स अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर केला आहे. तसेच लोक म्हणत आहेत. हे 20 तारीख येऊदेत मग मी दाखवतो. मी माझ्या आयुष्यात कधी कोणाला धमकी दिली नाही. त्यामुळे तुमच्या तोंडात किडे पडतील हरामखोरांनो… एवढं तरी खोटं बोलू नये. मी लहान कार्यकर्ता असला तरी मी त्या मतदाराशी सन्मानाने वागतो असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
News Title – BJP Tweeet About Vijay Wadettiwar
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपचा उमेदवारच करणार तुतारीचा प्रचार?; ‘या’ नेत्याच्या ट्वीटने खळबळ
लाडक्या बहिणींना अजितदादांचा नवा वादा! रकमेत होणार भरघोस वाढ
सोनं आज स्वस्त झालं की महागलं?, जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट दर
राज्यात विधानसभेला मेहुणे-मेव्हण्यात होणार टशन!
चंद्रकांत पाटलांच्या पुढाकारातून गदिमांच्या स्मारकाचं 70 टक्के काम पूर्ण!