भाजपकडून कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ सुरु- डी.के.शिवकुमार

बंगळुरु | कर्नाटकातील जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरु आहे, असा आरोप काँग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांनी केला आहे. ते सध्या कुमास्वामी सरकारमध्ये जलसिंचन मंत्री आहेत.

काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या संपर्कात असून ते मुंबईत एका हॉटेलमध्ये थांबले आहेत, असा दावा देखील डी.के.शिवकुमार यांनी केला आहे.

डी.के.शिवकुमार यांनी केलेले आरोप निराधार आहेत, असं प्रत्युत्तर भाजप नेत्या मालविका अविनाश यांनी दिलं आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या एकुण 224 जागांपैकी भाजपकडं 106 तर काँग्रेस-जेडीएस यांच्याकडे 116 असं संख्याबळ आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच, कार्यकर्त्यांनो तयारीला लागा”!

-…तर लोकसभेसाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार- शिवपाल यादव

-भगवान बाबांच्या मूर्तीचा भाग अज्ञात समाज कंठकाने जाळला

-आज उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर!

-…म्हणून न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला मिळाली संधी