बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल- शरद पवार

नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांचा समावेश होतो. मात्र या राज्यांच्या निवडणुकी दरम्यान भाजप फक्त एक राज्य जिंकू शकतो, असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी वर्तवलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तसेच पश्चिम बंगालमधील नागरिक स्वाभिमानी असून बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर संपूर्ण बंगाल एकसंघ होतो, असं देखील शरद पवारांनी म्हटलं आहे.

बारामतीतील माळेगाव तालुक्यातील गोविंदबाग या निवस्थानी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. यादरम्यान या निवडणुका पाच राज्यांमध्ये होत असल्या तरी आसाममध्ये भाजपचे राज्य असल्यामुळे इतर पक्षांपेक्षा भाजपची स्थिती चांगली आहे. याच कारणामुळे आसाममध्ये भाजप त्यांची सत्ता यशस्वीपणे राखू शकेल, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोणी काही बोललं तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीच सत्त येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केलाय’; शरद पवारांचा कोश्यारींना टोला

…अन् तसं झालं तर ठाकरे सरकार देखील पडू शकतं- कंगणा राणावत

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

‘स्फोटकांची कार लावण्यात सचिन वाझेंचा थेट सहभाग’; NIAचे वाझेंवर गंभीर आरोप

अभिनेत्री सायली संजीवचा बोल्ड अंदाज, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More