पाटणा | ‘एनडीए’ने राजद-काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महागठबंधनला मागे टाकत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. बहुमताच्या दिशेने भाजप पुढे असल्याचं दिसताच पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबाद अशी घोषणाबाजी सुरू झाली आहे.
या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भाजप हा मोठा भाऊ होणार, हे जवळपास निश्चित झालं आहे.
सध्या भाजपचे उमेदवार 71 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपपेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या संयुक्त जनता दलाचे उमेदवार 52 जागांवर आघाडीवर आहेत.
बिहारमध्ये एनजीएलाला बहुमत मिळत असल्याचं दिसताच भाजप कार्यालयात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी”
बिहार निवडणूक निकाल- चिराग पासवान किंग मेकर ठरणार का?
पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढू नका; तेजस्वी यादव यांचा नेत्यांना इशारा
बिहारमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, दुपट्टीने जागांवर आघाडी
बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होईल- संजय राऊत