मुंबई | महापालिका निवडणुकीसाठी भाजप पक्ष तयारीला लागला असून बुधवारी झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत भाजप येणार, मुंबई घडवणार अशी घोषणा करण्यात आली.
जनतेचा विचार करणारे लोक पालिकेच्या सत्तेत आणावे लागतील, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसंत स्मृती येथे झालेल्या बैठकीत म्हणाले.
राज्य सरकारने प्रकल्पांना विरोध करण्यापलिकडे काहीच केलेले नाही. आमच्या सरकारच्या काळात मुंबईचे सारे प्रकल्प मार्गी लागले.
तसेच फडणवीस म्हणाले की, “कोरोना काळातील भ्रष्टाचारावर पुस्तिका लवकरच प्रकाशित करु, आत्तापर्यंत टीका करायची नाही असे ठरवले होते. पण आता मात्र बोलणार”.
Interacting with media at BJP Office, Vasant Smruti Dadar, Mumbai.#GupkarGang https://t.co/epFtqwWJJ6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 18, 2020
महत्वाच्या बातम्या-
वीजबिलांवरून राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय- देवेंद्र फडणवीस
ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी
“अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच आता इतरांना शिकवत आहेत”
पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा- नारायण राणे
“राऊत साहेब, हिंदुत्व हिंदुत्व नुसतं बोलायचं नसतं, कृतीतही उतरवावं लागतं”