बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपवाले मत मागायला येतील दोन पायांवर पण जातील चौघांच्या खांद्यावर”

लखनौ | उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने यावेळी देखील पुन्हा खुर्ची मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपला हरविण्यासाठी राज्यातील काही पक्ष एकत्र येत ही निवडणूक लढवणार आहेत. अशातच आता सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी भाजप नेत्यांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

राजभर वाराणसी येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते.या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भाजपचे नेते, कार्यकर्ते जर मत मागायला आले तर त्यांना दोन पायावर पाठवू नका, असं राजभर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कार्यक्रमात महिलांना संबोधित करताना राजभर म्हणाले की, आता निवडणुका आल्या आहेत. भाजपचे नेते, कार्यकर्ते मंडळी मत मागण्यासाठी येतील. ते आले तरी त्यांना दोन पायावर परत पाठवू नका. ते येतील दोन पायांवर पण जातील चौघांच्या खांद्यावर.

दरम्यान, राजभर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. भाजप नेते राजभर यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला”

धक्कादायक! पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अभिनेत्रीचा मृत्यू

काळजाचा ठोका चुकवणारी घटना!; विहिरीत पडलेल्या सासूला वाचवण्यासाठी सुनेनं…

पीव्ही सिंधूकडून पदकाची आशा कायम; प्री- क्वाॅर्टर फायनलमध्ये धडक

‘आता माघार नाहीच’; शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह 14 पक्ष एकवटले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More