“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”

नवी दिल्ली |  येणाऱ्या लोकसभा निवडणुका ह्या भाजपसाठी युद्ध आहेत पण भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.

मोदी सरकारने साडेचार वर्षांत देशाचा विकास केल्यानं जगभरात भारताचा गौरव झाला, असंही अमित शहा म्हणाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करण्याचे विरोधकांचे प्रयत्न चालू आहेत त्यावर अमित शहा यांनी सडकून टीका केली आहे.

दरम्यान, राजधानी नवी दिल्ली येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन चालू आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले

-“…तर उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढवावी”

-“एरवी एकमेकांचे ‘चेहरे’ न पाहणारे महाआघाडी करतायेत”

-“सेहगल यांना न बोलावल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं”

-…तर पुन्हा बॅट हातात घेणार नाही- विराट कोहली