बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन’ पाडून आता ‘नरेंद्र मोदी प्रशिक्षण भवन’ बांधणार

गांधीनगर | गुजरातमधील माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नावाने असलेली इमारत पाडून पंतप्रधान मोदींच्या नावानं इमारत बांधण्याची तयारी सुरू आहे. तसेच यासाठी लागणारा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यानंतर बांधकामास सुरूवात होणार आहे.

गांधीनगरमधील इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन पाडून नरेंद्र मोदी प्रशिक्षण भवन बांधण्यासाठीचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव गुजरात पंचायत परिषदेमध्ये घेण्यात आला आहे. सदरील इमारत अत्यंत जुनी असून नवी इमारत बांधण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच इमारतीस नरेंद्र मोदींचे नाव देण्याचं देखील प्रस्तावात नमूद केलं आहे.

या प्रस्तावावर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री पटेल घेणार आहेत. तसेच या प्रस्तावाविषयी दिल्लीतील मोठ्या नेत्यांना माहिती देण्यात येणार असून यासाठी केेंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. तसेच एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील भेटणार आहे.

दरम्यान, या सदरील प्रस्तावास काँग्रेस नेत्यांकडून मोठा विरोध करत आहेत. काँग्रेसचं म्हणणं आहे, की भाजप राजकारण करत आहे. भाजपने नवीन तर काही केलं नाही. रेडिमेड विकायला सुरूवात केली आहे. ज्या गोष्टी ते विकू शकत नाहीत ते त्याची नावं बदलत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते अर्जुन मोढवाडिया यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘गाव जेवण एक दिवस देणार की तीन वर्षे?’; अशोक चव्हाणांचा खोचक सवाल

सोन्याच्या दरात 580 रुपयांची घट तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ, वाचा ताजे दर

IRCTCच्या स्टॉकमध्ये एवढी मोठी घसरण का? एक्सपर्ट म्हणतात…

मोठी बातमी! प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये अटक; कलम 144 लागू

“मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, मेलो तरी त्यांना सोडणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More