बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला लागणार मोठी गळती, अनेक बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा केल्यापासून महाविकास आघाडी अंतर्गत देखील कुरघोडी  चालल्याचं समोर आलं आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. विदर्भातील अनेक बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. आज नाना पटोले मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, विदर्भातील काही बडे नेते काँग्रेस पक्षात राहुल गांधींच्या जन्मदिनी प्रवेश करतील. हा एक ट्रेलर आहे संपूर्ण पिक्चर अद्याप बाकी आहे. ही घरवापसी असेल आणि जशास तसे अजून उत्तर द्यायचं आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससह इतर अनेक पक्षांतील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राज्यात भाजप सत्ता न मिळवू शकल्यानं अनेक नेत्यांची घरवापसी होत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता भाजपमध्ये गेलेले आणि आता पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असणारे हे नेते कोण असतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये देखील भाजपला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांसह अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले होते. यातील अनेक नेत्यांनी पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असं तृणमुल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

मूक आंदोलन सुरुच राहणार, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही – संभाजीराजे भोसले

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

लेडी बाहुबली! 37व्या वर्षीही महिलेचा साडीत जबरदस्त वर्कआऊट

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात लहान मुले कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण झपाट्याने वाढलं

मास्क न घालणाऱ्यांना झेडपी तिकीट नाही- सुप्रिया सुळे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More