बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात पुढचे 25-30 वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही”

मुंबई । शिवसेना आणि भाजप यांच्यात नेहमीच वाद-विवाद होत असताना पहायला मिळतात. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच असते. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

भाजपने स्वतःच अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. निराश मनाने राजकारण करतात. त्याच्या नशिबी शेवटी निराशाच येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 25-30 वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

भाजपने आत्ता महाराष्ट्राला विसरुण जावं. जरी भाजपचे 75-100 उमेदवार निवडून आले तरी महाराष्ट्राच्या भविष्यात आघाडी सरकारच सत्तेत असणार आहे. तोपर्यंत भाजप राहील की नाही माहीत नाही, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

दरम्यान, यापुढे भ्रष्ट लोकांशी हात मिळवणी होणार नाही. युतीत असतानाही आमच्या काही लोकांनी स्थानिक राजकारणाच्या नावाखाली अनेकदा भ्रष्ट नेत्यांकडून हातमिळवण्यात आले होते. शिवसेनेकडून असा प्रकार पुन्हा होऊ नये याची दक्षता घेतली जाईल, असंही राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या

हाॅटेलच्या टेरेसवरुन उडी मारत फॅशन माॅडेलचा आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांना व्हिडीओ काॅल करत म्हणाली….

Budget 2022: सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर – रामनाथ कोविंद

Budget 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी – नरेंद्र मोदी

कोरोना व्हायरसच्या लढाईत आता ‘ही’ लस ठरणार गेमचेंजर

तुमचं वजन वाढतयं का?, वजन कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More