“पुढची 25 वर्षे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही”
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांची कारवाई सुरु आहे. ईडीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष केलं जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबागमधील संपत्ती ईडीने (ED)जप्त केली आहे. यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे.
आज मुंबई एअरपोर्टवर संजय राऊतांचं शक्ती प्रदर्शन पहायला मिळालं यावोळी त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं. संजय राऊत यांचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत झालं. त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशे घेऊन शिवसैनिक विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढची 25 वर्षे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सूड उगवण्याच्या उद्देशानं भाजपनं कारवाईचा सपाटा लावल्याचं संजय राऊ म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
रोहित पवारांचा संजय राऊत यांना सल्ला, म्हणाले…
“शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर आहे का?, जर बाळासाहेब ठाकरे असते तर…”
‘चंद्रकांत दादा परत या, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही’, कोथरूडमध्ये पुणेकरांची खास टोमणेबाजी
पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…
किरीट सोमय्यांची नवी खेळी, अडचणी वाढताच…
Comments are closed.